जिल्ह्यात दि.२० नोव्हेंबरपासून कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम

 जिल्ह्यात दि.२० नोव्हेंबरपासून कुष्ठरुग्ण  क्षयरुग्ण शोध मोहीम

 

 

अकोला, दि. १० : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात जिल्ह्यात कुष्ठरुग्ण  क्षयरुग्ण  शोध मोहीम दि.२० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मोहिमकाळात नागरिकांनी  कुष्ठरोग  क्षयरोगाबाबत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी केले आहे.

 

 

जिल्ह्यातील १३ लक्ष ८३ हजार २९४ नागरिकांची कुष्ठरोग  क्षयरोगाबाबत  तपासणी करण्याचे नियोजन असून, त्यासाठी १ हजार ४२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मोहिमेत सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.  सर्व पथकांनी  जास्तीस जास्त कुष्ठरुग्ण  क्षयरुग्ण शोधून त्यांना त्वरित उपचाराखाली आणावे, तसेच नागरिकांनीही तपासणीस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी केले आहे. 

०००

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ