नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

 

अवेळी पावसाने शेतीचे नुकसान

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि. २६ ते २८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अवेळी पावसाने शेतीपिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानाबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात अवेळी पावसाने शेती व फळपिकांच्या नुकसानाबाबत सविस्तर पंचनामे व सर्वेक्षण करावे. तालुकास्तरावर संयुक्त स्वाक्षरीचा अंतिम अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.   

अवेळी पावसाने अंदाजे ४ हजार ६०८ हे. शेतजमीनीचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. अकोला तालुक्यात ४ हजार ५७६ हे. क्षेत्रावर गहू, हरभरा आदी पिकांचे , तर तेल्हारा तालुक्यात ३२ हे. वर भाजीपाला पिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बाळापूर तालुक्यात गायगाव शिवारात वारोडी बु. (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील इसाराम बिचकुले, तान्हाजी गोरे, सोना गजानन भिसे, श्यामराव बिचकुले आदींच्या मालकीच्या २० मेंढ्या दगावल्या. पातूर तालुक्यातील वहाळा येथील सारंगधर मोरे यांच्याकडील एक गाय दगावली.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ