बालकांचे हक्क जपण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर

 

बालकांचे हक्क जपण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा

-        जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश पुसदकर

अकोला, दि. 9 : बालकांसंबंधी अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी बाल संरक्षण क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन काम करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले.

बालकांचे हक्क व कायदेविषयक कार्यशाळा मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयात सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेला मुख्याध्यापिका सारिका वाजगे, पर्यवेक्षक उमेश कुळमेथे, नितीन अहिर, हर्षाली गजभिये, राहूल मनवर, किशोर मरोकार, आनंद बाबरेकर, दादा वंजारे, रोहित भाकरे व सुमारे चारशे विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी कळसूत्री या संस्थेमार्फत अभया या नाटिकेतून बाल संरक्षण व कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. स्नेहा धडवई व नीलेश बोडले यांनी नाटिका सादर केली. बालकांनी कुठलीही अनुचित घटना घडल्यास पोलीस, बाल संरक्षण यंत्रणेशी न घाबरता संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शरयू तळेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ