‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे जिल्ह्यात जनजागृती


 

‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे जिल्ह्यात जनजागृती

अकोला, दि. ३० : केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रे’द्वारे प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत ६० हून अधिक गावांत यात्रा पोहोचली असून, दि. २६ जानेवारीपर्यंत गावोगाव जनजागृती करणार आहे.

यात्रेद्वारे आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांना संबोधित केले. अकोला तालुक्यातील दुधलम , मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे,  अकोट तालुक्यातील कावसा  व तेल्हारा तालुक्यातील  अडगाव बु  येथे प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग व स्थानिक नागरिक उपस्थित होते.  

उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी व व्यापक जनसहभाग मिळविण्यासाठी जिल्ह्यात तालुका व ग्रामस्तरीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष तहसीलदार व सदस्य सचिव हे तालुक्याचे गटविकास अधिकारी आहेत. या समितीत नगरपरिषद मुख्याधिका-यांसह आरोग्य, कृषी, भूमी अभिलेख, पाणीपुरवठा, शिक्षण, वन, क्रीडा आदी खात्यांच्या तालुका अधिका-यांचा समावेश आहे.

ग्रामस्तरीय समिती तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली असून, सदस्य सचिव ग्रामविकास अधिकारी, तसेच सदस्य पोलीस पाटील, कोतवाल, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, ग्रामसंघ अध्यक्ष, उमेद प्रेरिका आदी आहेत. जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिनारायण सिंह परिहार, महापालिका उपायुक्त गीता वंजारी, जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र बेंबरे हे उपक्रमाचे नोडल अधिकारी आहेत.

 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ