विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय आज घेणार मतदार यादीचा आढावा

 

विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय

आज घेणार मतदार यादीचा आढावा

 

अकोला, दि. २८  : छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार त्या बुधवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी मतदार यादीविषयक कामांचा आढावा घेणार आहेत.

 

मतदार यादी निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व संसद सदस्य, विधानसभा सदस्य व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चेसाठी बैठक बुधवारी दु. ३ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. मतदार यादीतील नोंदणी बाबत आक्षेप व इतर तक्रारींच्या अनुषंगाने यावेळी चर्चा होईल.

मतदार यादी निरीक्षक या दिवशी जिल्ह्यातील मतदार केंद्रांनाही भेटी देणार आहेत, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.

 

 

सहाय्यक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत म्हस्के यांची मतदार यादी निरीक्षकांचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परांडेकर यांनी दिली.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ