रौंदळा गावातील एका जनावरात लंपी प्रादुर्भाव आढळला

  रौंदळा गावातील एका जनावरात लंपी प्रादुर्भाव आढळला

 अकोला, दि. १७ : अकोट तालुक्यातील रौंदळा गावातील एका मादी वासरात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने तेथील संसर्ग केंद्रापासून दहा किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसा आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी डॉ. शरद जावळे यांनी आज निर्गमित केला.

बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जंतुकीकरण करून परिसरात जनावरांची खरेदी व विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. संसर्ग केंद्राच्या ५ किमी परिघातील जनावरांना गोट पॉक्स लसीकरण १०० टक्के पूर्ण यावे, असे आदेश पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय यंत्रणेला देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ