भटक्या विमुक्त जमातींतील व्यक्तींसाठी दि. २ व ३ डि्सेंबरला विशेष शिबिर

 

 महिला सेक्स वर्कर, तृतीयपंथी व्यक्तींचीही होणार नोंदणी

भटक्या विमुक्त जमातींतील व्यक्तींसाठी

दि. २ व ३ डि्सेंबरला विशेष शिबिर

अकोला, दि. ३० :  जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीतील व्यक्ती, त्याचप्रमाणे महिला सेक्स वर्कर, तृतीय पंथी व्यक्तींच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर दि. २ व ३ डिसेंबर रोजी सर्व मतदान केंद्रांवर  होणार आहे. अद्यापपर्यंत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या सर्व व्यक्तींनाही यादिवशी नोंदणी करता येणार आहे.

 जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी झाल्याशिवाय राहू नये. नियोजित शिबिरांच्या माध्यमातून अधिकाधिक नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी येथे दिले आहेत.  

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध घटकांसाठी सातत्याने मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी भटक्या, विमुक्त जमातीतील व्यक्ती, त्याचप्रमाणे महिला सेक्स वर्कर, तृतीय पंथी व्यक्ती यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शिबिर होणार आहे.

सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी केंद्रावर उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी, तसेच मतदार म्हणून अद्याप नोंद न झालेल्या पात्र व्यक्तींनी शिबिराला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.

 

०००  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ