जादा दर आकारणा-या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करणार - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

 

  जादा दर आकारणा-या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करणार

-        उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

अकोला, दि. 9 : खासगी बससाठी कमाल भाडेदर शासन निर्णयाद्वारे निश्चित करून देण्यात आले आहेत. त्याहून अधिक दर आकारल्याचे आढळल्यास नागरिकांनी ऑनलाईन तक्रार द्यावी. अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

याबाबत दि. 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयाद्वारे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडे दर विचारात घेण्यात आले आणि खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर निश्चित करण्यात आले आहे.

त्यामुळे खासगी ट्रॅव्हलकडून कमाल भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारल्यास त्यासंदर्भात dycommr.enf2@gmail.com ई-मेलवर किंवा dyrto.30-mh@gov.in  या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती दुतोंडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ