उमेदवारांनी ग्रा. पं. निवडणूक खर्च सादर करण्याची सूचना

अकोला, दि. 7 : ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूक लढविणा-या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निकाल घोषित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. हा खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांनी टू वोटर ॲपचा वापर करणे अनिवार्य आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून हिशोब सादर करावा. काही तांत्रिक अडचण आल्यास 7767008612 किंवा 7767008613 किंवा 7767008614 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ