विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेत उद्योजकता प्रशिक्षण शिबीर

 

 

विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेत उद्योजकता प्रशिक्षण शिबीर

अकोला, दि. 3 : जिल्हा उद्योग केंद्र व ‘मिटकॉन कन्सल्टन्सी’च्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक, युवती, महिलांसाठी 18 दिवसांचे विनामूल्य निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  

 

किमान आठवी उत्तीर्ण व वयोमर्यादा 18 ते 45 दरम्यान असलेल्या, तसेच पूर्णवेळ उपस्थितीची तयारी असलेल्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल.  प्रवेशासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख दि. 7 नोव्हेंबर असून अधिक माहितीसाठी ‘मिटकॉन’चे जिल्हा समन्वयक प्रभाकर आर. चौधरी, मिटकॉन  कार्यालय, अंबिका कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट, नविन राधाकिसन प्लॉट, अमृतवाडीजवळ, अकोला येथे किंवा ८७८८७६०५६१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम