ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमात गहू बियाण्यासाठी अनुदान

 ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमात गहू बियाण्यासाठी अनुदान

अकोला, दि. 1 :  जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या माध्यमातून गहू या पीकासाठी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.  याअंतर्गत शासनाकडून बियाण्यासाठी अनुदान देण्यात असून, शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी आज येथे केले.     

 गहू पिकाला बियाणे 40 किलो प्रतिएकर (0.40 हे.) मर्यादेत एक शेतकऱ्याला 640 रू. अनुदानावर देय आहे. अनुदानासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात परमिट वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी मूळ आधारकार्ड, सातबारा आणि मागासवर्गीय शेतकरी असल्यास जातीच्या दाखल्याची स्वयंस्वाक्षांकित प्रत आवश्यक आहे. या योजनेत सर्वसाधारण,अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील अत्यल्प किंवा अल्पभूधारक (अपंग, महिला, माजी सैनिक,आत्महत्याग्रस्त कुटुंब) शेतकऱ्यांना 0.40 हेक्टर मर्यादेपर्यंत 40 किलो बियाणे प्रतिलाभार्थी मिळू शकेल व प्रथम येणाऱ्यास प्रथम तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.

प्रमाणित बियाणे वितरण घटकाअंतर्गत गहू  पिकाचे वाण उपलब्धतेप्रमाणे वितरित होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिकृत बियाणे वितरकाकडून अनुदानित दराने ग्राम बीजोत्पादन खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. किरवे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या नजिकच्या कार्यालयाशी तसेच महाबीज कार्यालयाशी संपर्क साधावा.  

                                                   ०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ