समान व असमान निधी योजनेत शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविले

 राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान

समान व असमान निधी योजनेत

शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविले

अमरावती, दि. 3 : कोलकाता येथील राजा राममोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने ग्रंथालयाच्या अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यात चालू वर्षासाठी समान व असमान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

 

           समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेसाठी 25 लक्ष रू व असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्ताराअंतर्गत फर्निचर खरेदीसाठी 4 लक्ष रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येते.

त्याचप्रमाणे, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी 2 लक्ष 50 हजार रुपये व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरणासाठी 2 लक्ष रुपये अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष (जसे 50, 60, 75, 100, 125 व 150 वर्ष) साजरे करण्यासाठी 6 लक्ष 20 हजार रुपये व इमारत विस्तारासाठी 10 लक्ष रु. अर्थसहाय्य. राज्यस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रमाच्या आयोजनासाठी 1 लक्ष 50 हजार रुपये, 2 लक्ष 50 हजार रुपये व 3 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येते. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय "बाल कोपरा स्थापन करण्याकरीता 6 लक्ष 80 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

प्रस्ताव पाठविण्याचे नियम,अटी व अर्जाचा नमुना www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा. त्याचप्रमाणे, संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी या योजनेपैकी कोणत्याही एका योजनेसाठी प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी व हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ