पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करून घ्यावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करून घ्यावी


- जिल्हाधिकारी अजित कुंभार


अकोला, दि. १६ : वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व व्यक्तींनी दि. ९ डिसेंबरपूर्वी मतदार नोंदणीचा अर्ज भरून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हााधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. 

भारत निवडणुक आयोग व  मुख्य निवडणुक अधिकारी यांच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त  पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित नविन मतदार नोंदणी कार्यक्रम 9 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. त्याअनुषंगाने नवमतदार, महिला, दिव्यांग, तृतीयपंथी,विमुक्त  जाती जमाती व भटक्या जमाती व इतर घटकांची मतदार नोंदणी मोठया प्रमाणात करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


उपजिल्हा निवडणुक अधिकारी  व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून अकोला पूर्व मतदारसंघात मतदार रथ ठिकठिकाणी जनजागृती करत आहे.

अद्यापही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी आपले नांव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे किंवा वोटर हेल्प्लाईन अॅपद्वारे 

किंवा nvsp.in या वेबसाईटद्वारे सादर करावा.

मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अकोला यांचे कार्यालयातही अर्ज सादर करता येईल.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ