शेतजमीन असलेल्या मातंग समाजाच्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

 

शेतजमीन असलेल्या मातंग समाजाच्या

व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन

 

अकोला, दि. २१ : जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील स्वत:ची शेतजमीन असलेल्या व्यक्तींनी माहिती सादर करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

महामंडळाच्या योजनांच्या अनुषंगाने व विविध अभिलेख अपडेट करण्यासाठी शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकारातील छायाचित्र आदी माहिती दि. १५ डिसेंबरपूर्वी महामंडळाचे जिल्हा कार्यालय, कौलखेड रस्ता, नालंदानगर फलकाजवळ, आरोग्यनगर चौक, अकोला येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम