बालगृहातील बालकांची भाऊबीज उत्साहात

 



 

 बालगृहातील बालकांची भाऊबीज उत्साहात

अकोला, दि. 17 : शासकीय बालगृह व गायत्री बालिकाश्रम येथील बालकांची भाऊबीज बुधवारी उत्साहात साजरी झाली.

जिल्ह्यात महिला व बालविकास विभागांतर्गत 3 बालगृह व 9 शिशुगृह कार्यरत आहेत. शासकीय बालगृहात मुले, तर गायत्री बालिकाश्रम येथे बालिका प्रवेशित आहेत.

बालकल्याण समितीचे सहकार्य व गायत्री बालिकाश्रमाच्या पुढाकाराने शासकीय बालगृहातील बालकांना भाऊबीज साजरी करण्यासाठी गायत्री बालिकाश्रम येथे आणण्यात आले. सर्व बालक व बालिका यांना भाऊबीज सणाबाबत माहिती देण्यात आली. या बालिकाश्रमातील सर्व बहिणींनी शासकीय बालगृहातील भावांना ओवाळले. यावेळी सर्वांना अल्पोपहारासह भेटवस्तू व फटाके वाटपही करण्यात आले. सर्व मुलांनी बालिकाश्रमाच्या प्रांगणात फटाके उडविण्याचा आनंद घेतला.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बालकल्याण समितीच्या अॅड. अनिता गुरव, प्रांजली जैस्वाल, राजेश देशमुख, गायत्री बालिकाश्रमाचे सचिव गणेश काळकर, सदस्या मीराताई जोशी, अश्विनीताई सुजदेकर, सुधाकर गीते यांचे उपक्रमाला मार्गदर्शन लाभले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडुलकर, गायत्री बालिकाश्रमाच्या वैशाली भारसाकळे, भाग्यश्री घाटे, शासकीय बालगृहाच्या जयश्री हिवराळे, अनिल इंगोले, सूर्यादय बालगृहाचे शिवराज पाटील यांनी परिश्रम घेतले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ