पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा -पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे

 पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा

-पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे

अकोला, दि. 10 : पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 8 डिसेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन व शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाद्वारे विविध योजना व उपक्रम राबवले जातात.

वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५ प्लस ३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया चालू वर्षात राबविली जाणार आहे.

पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. ८ डिसेंबरपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन श्री. बुकतारे यांनी केले आहे.

 ऑनलाईन अर्ज https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर, त्याचप्रमाणे गुगल प्ले स्टोअरवरील AH-MAHABMS या ॲप्लिकेशनद्वारे भरता येईल. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या क्रमांकावर किंवा नजिकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ