‘जलजीवन मिशन’मधून 39 गावांतील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करणार - जिल्हाधिकारी अजित कुंभार



 ‘जलजीवन मिशन’मधून 39 गावांतील जलस्त्रोतांचे बळकटीकरण करणार

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 1 : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 39 गावांना पाणीपुरवठा करणा-या जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात येणार असून, या कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

जलजीवन मिशनबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड व विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील 39 गावांतील पाणीपुरवठा योजनांचा जलस्त्रोत असलेल्या विहिरीच्या उद्भव क्षेत्रात जल पुनर्भरणासाठी रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज स्ट्रेंच बसविण्यात येणार आहेत. या कामांचे गावनिहाय परिपूर्ण नियोजन करून आवश्यक कार्यवाही करावी व कामांना गती द्यावी.  

दख्खनच्या पठारात आढळणा-या बेसाल्ट या खडकात जिल्ह्यातील बहुतांश पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत निश्चित करण्यात आले आहेत. या खडकात पाणी उपलब्धतेबाबत कुठेही निश्चित अशी समानता आढळून येत नाही. त्यामुळे पेयजलाच्या स्त्रोताच्या वरील बाजूस किमान 500 मीटरपर्यंत स्त्रोत बळकटीकरणासाठी कामे घेतल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे रिचार्ज शाफ्ट व रिचार्ज स्ट्रेंच निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे गावांना पाणीपुरवठा करणा-या योजनांच्या विहिरींच्या क्षेत्रात भूजलात वाढ व्हायला मदत होईल, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री. कराड यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ