विश्वकर्मा योजनेत ‘मास्टर ट्रेनर’ची आवश्यकता इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

विश्वकर्मा योजनेत ‘मास्टर ट्रेनर’ची आवश्यकता

इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. 2 : हस्तकारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना राबविण्यात येते. त्यात विविध 18 ट्रेडचे प्रशिक्षण युवकांना दिले जाते. प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची आवश्यकता असून इच्छूकांनी अर्ज करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार सहायक आयुक्त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

योजनेत मिस्त्री, गवंडी, टेलर, सुतार, आर्मरर, बोट मेकर, बार्बर (न्हावी), ब्लॅकस्मिथ (लोहार), कॉबलर (चर्मकार), पॉटर (कुंभार), वाशरमन, सोनार, हॅमर अँड टुलकिट मेकर, मालाकार, टोपली, चटई तयार करणारा, डॉल अँड टॉय मेकर, फिशिंग नेट मेकर, शिल्पकार, लॉक स्मिथ (कुलुप तयार करणे व दुरुस्ती) आदी 18 ट्रेडचे प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची आवश्यकता आहे.  

        किमान 20 वर्षे अनुभव असलेल्या इच्छूक व्यक्तींनी नोंदणीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला येथे किंवा 9665775778 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

                              ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम