जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी 267 पदांसाठी पं. उपाध्‍याय रोजगार मेळावा

 जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी

267 पदांसाठी पं. उपाध्‍याय रोजगार मेळावा

 

 

            अकोला, दि. 8 : जिल्‍ह्यातील नोकरी इच्‍छूक उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील नोकरीच्‍या संधी उपलब्‍ध व्‍हाव्‍यात यासाठी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेच्या सहकार्याने जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसरात पं. दीनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावा उद्या, गुरूवारी (दि. 9 नोव्हेंबर) सकाळी 11 ते 2 या वेळेत होईल.

            सर्वसाधारणपणे दहावी, बारावी,  पदवी , आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर या शैक्षणिक पात्रतेच्या  खाजगी  क्षेत्रात नोकरी इच्‍छूक युवक व युवतींसाठी  क्रेडिट अॅक्‍सेस  ग्रामीण लि.,  स्‍वतंत्र  मायक्रो  फायनान्‍स, अस्‍पा ग्‍लोबल सर्व्हिस, एसओएम ऑटोटेक, महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा, सिएट टायर, हिताची, क्क्‍नोर ब्रेसमी, ब्रोस इंडिया अशा विविध कंपन्यांतील 267 पदे अधिसूचित करण्यात आली आहेत.

 

 जिल्ह्यातील जास्‍तीत जास्‍त नोकरी इच्‍छूक उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, बायोडेटा तसेच पासपोर्ट साईज फोटोसह स्‍वखर्चाने जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर, नविन इमारत,दुसरा माळा,  अकोला येथे  उपस्थित राहून संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन सहायक आयुक्‍त द. ल. ठाकरे यांनी केले आहे.

०००                                                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ