दुष्काळसदृश परिस्थितीत सवलती; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

 

अकोला, दि. 28 : शासन निर्णयानुसार दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू सवलतीबाबतचा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला आहे.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत महसूल व वनविभाग दि. 10 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिली पेक्षा कमी झाले आहे. परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण 1021 महसूली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून 8 सवलती लागू करण्यास संबंधीत विभागांना आदेशित करण्यात आले आहे.  

त्यानुसार जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी बाबींचा समावेश आहे.


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ