मतदार नोंदणी, यादी दुरुस्तीसाठी विशेष ग्रामसभा शहरात दि. ४ ते ७ नोव्हें. दरम्यान वॉर्डसभा नागरिकांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


अकोला, दि. ३ : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात दि. ४ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा व महापालिका, तसेच सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात विशेष वॉर्ड सभा घेण्यात येणार आहेत. यावेळी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांची मतदार नोंदणी व मतदारांच्या तपशीलात  आवश्यक दुरुस्तीसाठी अर्ज स्वीकारण्यात येतील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

ग्रामसभा, तसेच वॉर्डसभेत मतदार यादीचे वाचन होऊन नागरिकांना नोंदी तपासता येतील. मतदारांच्या नोंदणीचे प्रमाणीकरण करण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ऍप व बीएलओ ऍपद्वारे आधार क्रमांक मिळवण्यात येतील. तपशीलात दुरुस्ती आवश्यक असल्यास व नव्याने नाव नोंदणीसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. कायम स्थलांतरित व मयत मतदारांची वगळणी, विवाह होऊन गावाबाहेर गेलेल्या, तसेच विवाहानंतर गावात आलेल्या महिला मतदारांच्या नोंदी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे आदी कामे करण्यात येतील.

ग्रामसेवक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरिकांना मार्गदर्शन व मदत करतील. हरकती, आक्षेप, दुरुस्तीचे अर्ज संकलित करून मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. ऍपद्वारे नोंदणी करण्याबाबत, मतदार यादीच्या कामाबाबतही माहिती दिली जाईल. मतदार नोंदणी अधिकारी व बीएलओ यांचे संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून दिले जातील. ग्रामसभा, वॉर्डसभेत सहभागी होऊन नागरिकांनी नोंदणी व दुरुस्ती होऊन मतदार यादी निर्दोष होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी केले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ