जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखविली हिरवी झेंडी

 



जिल्ह्यात ‘विकसीत भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ

 

  जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखविली हिरवी झेंडी

 

अकोला, दि. 23 : केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती, तसेच लाभ जिल्ह्यातील गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी ‘विकसीत भारत संकल्प यात्रे’चा शुभारंभ आज येथे झाला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यात्रारथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

 

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, नोडल अधिकारी सूरज गोळे, आयुष्मान भारत योजना समन्वयक डॉ.अश्विनी खडसे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले प्रकाश वैद्य, सचिन कोकणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यात्रेद्वारे जिल्ह्यात दि. 26 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी पोहोचून गरजूंना माहिती व लाभ मिळवून देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील खेडोपाडी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहोचणार आहे. त्यासाठी चार सुसज्ज वाहने ठिकठिकाणी पोहोचणार आहेत. सर्व विभागांचा सहभाग या उपक्रमात आहे. योजनांसाठी पात्र असूनही अद्यापपर्यंत लाभ न मिळालेल्या नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरेल, असे जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी सांगितले.

 

आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या यात्रेदरम्यान केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा, उज्ज्वला, मुद्रा, किसान सन्मान, जनधन योजनेसह वनहक्क महसूल विभागाची स्वामित्व योजना, एकलव्य योजना, आयुष्यमान कार्ड तसेच अन्य योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

 

          या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशीप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ