प्रोत्साहनपर लाभ योजनेचे पोर्टल सुरू

 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

प्रोत्साहनपर लाभ योजनेचे पोर्टल सुरू

अकोला, दि. २० : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन लाभ योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले असून, संबंधित पात्र लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक व्ही. डी. कहाळेकर यांनी केले आहे.

प्रोत्साहनपर योजनेचे पोर्टल बंद असल्याने तक्रारीचे निवारण व पात्र सभासदांच्या वारसाची माहिती पोर्टलवर अपलोड करता आली नाही. तथापि, आता पोर्टल सुरू करण्यात आले असून, योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची व वारसांची माहिती तत्काळ अपलोड करावी. याबाबत अग्रणी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच सर्व बँकांना सूचित करण्यात आले आहे, अशी माहिती उपनिबंधक श्री. कहाळेकर दिली.

 

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम