पाटसूल येथील अनु.जाती मुलांची शासकीय निवासी शाळा;प्रवेश प्रक्रिया सुरु

  अकोला,दि.17(जिमाका)- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसूल ता. अकोट जि. अकोला येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता सहावी ते दहावीच्या वर्गात रिक्त जागानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश अर्ज शाळेत कार्यालयीन वेळेत विनामुल्य उपलब्ध आहेत. ही शाळा निवासी स्वरुपाची असून  विद्यार्थ्यांना मोफत भोजन, निवास, निवासी व्यवस्था, शैक्षणिक साहित्य तथा सर्व भौतिक सोयी-सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात. ज्या पालकांना आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश द्यावयाचा असेल त्यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अकोला व अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पाटसूल ता. अकोट जि. अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन  मुख्याध्यापक एस. व्ही. पहुरकर यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ