अनु.जाती मुलींच्या गोरेगाव खु. शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश

 अकोला दि.2(जिमाका)- अनुसूचित जाती व नव बौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगाव खु. ता. अकोला येथे शैक्षणिक वर्ष सन 2022-23 साठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या या शाळेत  इयत्ता 6वी, 7 वी, 8 वी  तसेच 9 वी व 10 वी च्या वर्गांकरीता रिक्त जागांसाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे. या शाळेत पालकांनी संपर्क साधून प्रवेश घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ