सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत गावनिहाय जनजागृती

 अकोला दि.2(जिमाका)- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ध्वजारोहणानंतर वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांनी  सांगळूद, चाचोंडी,  वरुडीव, यावलखेड, हातगाव, सोनाळा, गुडघी या गावांना भेटी देऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती दिली.या उपक्रमात डी.बी. बोथीगे, गृहपाल लव्हाळे, श्रीमती चेढे, श्रीमती तिवारी, श्रीमती राऊत या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला,असे गृहपाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह यांनी कळविले आहे.

00000

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ