उद्योजकता विकास प्रशिक्षण;अनुसूचित जातीच्या उमेदवारांकरीता एक महिण्याचे प्रशिक्षण

 

अकोला,दि.30(जिमाका)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतीकरिता निशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण दि. 6 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत होणार असून प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रवेश अर्ज बुधवार दि. 1 जून पर्यंत करावा. प्रत्यक्ष मुलाखत सोमवार दि. 4 जून  रोजी होईल, अशी माहिती एमसीईडीचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी दिली.

 अनुसूचित जातीच्या युवक-युवती नवउद्योजकांना उद्योजकता विकास  संबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:चा उद्योग व्यवसाय-स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश आहे. निवासी स्वरूपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंबधी माहिती, उद्योगाची निवड, उद्योग उभारणी, व्यवस्थापन, बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन निगडीत कायदे व अंमलबजावणी कार्यपद्धती, उद्योग आधार नोंदणी, शासकीय विविध कर्ज योजना, सोयी सवलती आणि कार्यप्रणाली, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उत्पादनाच्या किंमती, हिशोब पद्धती, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योजकांचे अनुभव कथन, उद्योगांना प्रत्यक्ष भेटी, डिजिटल मार्केटिंग तसेच उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापण इत्यादी विषयी तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत  माग्दर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षणासाठी प्राप्‍त झालेले अर्जानुसार प्रशिक्षणार्थ्यांना शुक्रवार दि. 3 जून रोजी प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येईल. यामध्ये 18 ते 45 वयोगटातील आठवी पास असलेले व बार्टी स्थापित युवा गटातील लाभार्थ्यांस प्राधान्य दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीतून शनिवार दि. 4 जून रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भुविकास बँक एस.पी ऑफीसच्या बाजूला, अकोला येथे निवड करण्यात येणार आहे. प्रशिक्षणासंबधी अधिक माहितीकरीता कार्यक्रम आयोजिता कविता शिरसाट(मो.न.8600807001), प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी व बार्टीचे प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ