बालगृहातील 61 बालकांचे कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण

 


अकोला दि.9(जिमाका)- शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या  चारही बालगृहातील बालकांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करुन 61 बालकांचे दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करण्यात आले.

वय वर्षे 12 ते 14 व वय वर्षे 15 ते 18 च्या बालकांना कोरोन प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यात चार बालगृह कार्यरत असुन बालगृहातील बालके लसीकरणापासुन वंचीत राहु नये व बालगृहातील बालकांचे कोवीड 19 या आजारापासुन संरक्षण व्हावे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापशी यांच्या सहकार्याने गुरुवारी (दि.5) बालगृहातील बालकांसाठी विशेष शिबीर घेवुन पात्र बालकांना लस देण्यात आली.  तर गायत्री बालिकाश्रम येथे शनिवारी (दि.7) रोजी दुसऱ्या डोस साठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या लसीकरण शिबीराम ध्ये बालगृहातील सर्व 61  बालकांचे लसीचे दोन्ही डोस पुर्ण झाले, ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास गरसाळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल लाडुलकर, शासकीय बालगृहांच्या अधीक्षक जयश्री वाडे, सुर्यादय बालगृहाचे शिवराज खंडाळकर,प्रशांत देशमुख गायत्री बालिकाश्रमाच्या विजयता रायपुरे,प्रियंका टाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.मनिषा वाघमारे, पर्यवेक्षक आकोटकर, आरोग्य सेवक पवार, आरोग्य सेवीका कल्पना नाईक या सर्वांनी प्रयत्न केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ