जि.प. स्थानिक उपकर योजना शेतकऱ्यांकडून 31 मे पर्यंत अर्ज मागविले

 अकोला,दि.17(जिमाका)- जिल्हा परिषद उपकर योजना(सेसफंड) सन 2022-23 अंतर्गत जिल्हा परिषद कृषि विभाग, अकोला मार्फत विविध योजनाकरीता सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान दिले जाते. त्यात एचडीपीई पाईप, इलेक्ट्रीक मोटरपंप पाच एचपी, बॅटरी ऑपरेटेड पॉवर स्प्रेअर व प्लॉस्टीक ताडपत्री 450 जी.एस.एम. सर्वसाधारण शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समितीस्तरावर मंगळवार दि. 31 मेपर्यंत अर्ज  करावा. योजनेसंबधी अधिक माहितीकरीता शेतकऱ्यांनी संबधित पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा. या योजनेचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर बा. इंगळे यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ