मिशन वात्सल्य आढावा :नोकरदार महिलांच्या बालकांसाठी संगोपन केंद्राचे नियोजन करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

 





अकोला दि.9(जिमाका)- जिल्ह्यात नोकरी वा कामानिमित्त ज्या महिलांना कार्यालयात जावे लागते त्या महिलांच्या बालकांचा योग्य सांभाळ व्हावा यासाठी संगोपन केंद्र कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हा कृती दल मिशन वात्सल्यची आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी चंद्रशेखर चेके, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजू लाडुलकर, बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) दिलीप इंगळे, बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामिण) अनिता रायबोले, अपर्णा उगले, समाधान राठोड, भारती लांडे, उईके मॅडम, डॉ. शिवाल मॅडम, हर्षाली गजभिये आदी उपस्थित होते.

या बैठकीत कोविड मुळे दोन्ही पालक गमावलेल्या पाच अनाथ बालकांना  केंद्र व राज्य शासनाचा मदत निधी हा प्राप्त झाला असून  तो संयुक्त खात्यात व मुदत ठेवीत ठेवण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. तसेच एक पालक गमावलेल्या 143 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेचा लाभ देण्याचे काम अजुनही सुरु आहे. कोविड मुळे कर्ता पुरुष दिवंगत झाल्याने  विधवा झालेल्या महिलांच्या रोजगारासाठी तसेच त्यांच्या अपत्यांसाठी करावयाच्या मदतीचा आढावा घेण्यात आला. याबाबत दर महिन्याला तालुकास्तरावही आढावा घेऊन पात्र लाभार्थ्यांना मदत मिळवून द्यावी,असेही जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या. जिल्ह्यात नोकरदार वा कामकाजासाठी घराबाहेर जावे लागणाऱ्या महिलांच्या बालकांचा सांभाळ व्हावा यासाठी  तालुका बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माध्यमातून  संगोपन केंद्र सुरु करण्याचे नियोजन करावे,असे निर्देशही दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून बाल न्याय निधीबाबत माहिती देण्यात आली असून त्यानिधीतून कोविडमुळे दोन्ही पालक वा एक पालक गमावलेल्या बालकांच्या शैक्षणिक साहित्यासाठी खर्च करावयाचा आहे, यानिधीचाही लाभ बालकांपर्यंत पोहोचवावा,असे निर्देश जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ