कंत्राटी कला शिक्षक,संगणक शिक्षक पदासाठी लेखी परीक्षा दि.29 रोजी

 अकोला,दि.17(जिमाका)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांवर कला शिक्षक व संगणक शिक्षक या कंत्राटी पदासाठी लेखी परीक्षा रविवार दि.29 रोजी होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र दिलेल्या पत्त्यावर पाठविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना प्रवेश पत्र प्राप्त झाले नाही अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथून दि. 25 व 26 मे रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

एकात्मिक आदिदीवासी विकास प्रकल्प,अकोला यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांवर कला शिक्षक व संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरिता दि. 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 दरम्यान आवेदन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जानुसार कंत्राटी कला शिक्षक पदासाठी 149(पदवीधर अंशकालीन उमेदवारासह) तसेच कंत्राटी संगणक शिक्षक या पदासाठी 114 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही कंत्राटी पदासाठी रविवार दि. 29 मे रोजी सकाळी 11 वाजता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन रोड, अकोला येथे लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांच्या आवेदन अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर रजिष्टर पोस्टाने पाठविण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांना मंगळवार दि. 24 मे पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाही,  अशा उमेदवारांनी आपले प्रवेशपत्र प्रकल्प अधिकारी,  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन इमारत, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोला येथून दि. 25 व 26 मे रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

 परीक्षेरीता प्रश्नपत्रिकेचे स्वरुप: 100 प्रश्न प्रत्येकी दोन गुणांसाठी याप्रमाणे 200 गुणांची लेखी परीक्षा असेल. यामध्ये कंत्राटी कला शिक्षक पदाचे लेखी परीक्षेकरीता सामान्यज्ञान 70 प्रश्न व आर्ट टिचर डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न राहतील. तर कंत्राटी संगणक शिक्षक पदाचे लेखी परीक्षेकरिता सामान्य ज्ञान 70 प्रश्न व संगणक विषयासदंर्भात 30 प्रश्न राहतील,असेही कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ