डाकविभागात कॅशलेस व्यवहार


अकोला,दि.27 (जिमाका) - डाक विभागातील जिल्हा व तालुका पातळीवरील 46 कार्यालयामध्ये क्यु. आर. कोड उपलब्ध करण्यात आले आहे. या सुविधेमुळे डाक विभागातील सर्व व्यवहार कॅशलेस होणार होणार असून या सुविधेचा लाभ ग्राहाकांनी घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक यांनी केले आहे.

 डाक कार्यालयातील उपलब्ध असलेल्या विविध सेवा जसे रजिस्टर पत्र, स्पीडपोस्ट, पार्सल बुकिंग व आर.डी. भरणा इत्यादी सेवा क्यु. आर. कोडचा वापर करुन कॅशलेस पद्धतीने  करता येणार आहे. याशिवाय डाकविभागातर्फे ग्राहकांकरिता इंटरनेट बँकिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याव्दारे ग्राहकांना एन.ई.एफ.टी., ऑनलाईन बील पेमेंट सुविधांचा लाभ घेता येणार आहे. तसेच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरुन एन.ई.एफ.टी व्दारे कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे पाठविता किंवा जमा करता येणार आहे.  सद्या देशातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमधील एसबी, आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, एसएसए, एनएससी, केव्हीपी व एससीएसएस योजनांमध्ये जास्त व्याजदर दिला जातो. तरी या सेवेचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ