रोजगार मेळावाः निवड झालेल्या उमेदवारांची पहिली तुकडी पुण्याकडे रवाना

 








संधीचे सोने करा, स्वतः नोकरी देणारे व्हा!-जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला दि.12(जिमाका)- पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मिळालेली नोकरीची ही संधी ही तुमच्या आयुष्यातील पहिली संधी आहे; या संधीचे सोने करा. ही जरी नोकरीची पहिली संधी असली तरी अनुभव घेऊन आपण स्वतः उद्योजक व्हावे आणि इतरांना नोकरीची संधी देणारे व्हा, अशा शब्दात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी युवक युवतींना प्रोत्साहित केले.

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम असलेल्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची पहिल्या 50 जणांची तुकडी आज पुण्याकडे रवाना झाली, त्यावेळी त्यांना शुभेच्छा देतांना जिल्हाधिकारी अरोरा बोलत होत्या.

रविवार दि.8 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार मेळावा पार पडला होता. त्यात 436 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यापैकी 142 जणांची प्राथमिक निवड झाली होती. त्यात पुणे चाकण येथील महिंद्रा ॲण्ड महिंद्रा या कंपनीत 102 जणांची निवड झाली. या 102 जणांपैकी 50 जणांना पुण्याला जाण्यासाठी आज रवाना करण्यात आले. त्यांच्या प्रवासाची सोय कंपनीमार्फत करण्यात आली.  

त्यांना निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांच्यासह जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डी.एल. ठाकरे, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, कंपनी प्रतिनिधी  परमेश्वर राजबिंडे आदी उपस्थित होते.

सर्व उपस्थित उमेदवारांना सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांना प्रवासात अल्पोपहारासाठी खाद्यपदार्थ व पाणी बॉटल वाटप करण्यात आले. पुणे येथे कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी बस ला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ