रुग्णवाहिकांचे भाडेदर वाहनाच्या दर्शनी भागात लावावे- उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे

 अकोला दि.10(जिमाका)- जिल्ह्यात रुग्णवाहिकांचे भाडेदर हे जिल्हा परिवहन प्राधिकरणाने निश्चित केले असून त्यानुसार हे दर रुग्णवाहिकांच्या दर्शनीभागात लोकांच्या नजरेस पडतील असे लावावे, असे आवाहन उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

यासंदर्भात श्रीमती दुतोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन आयुक्‍त महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांनी दि. 25 एप्रिल रोजी दिलेल्‍या सुचनेनुसार, रूग्‍णवाहीकेमध्‍ये रूग्‍णवाहीकेचे भाडेदर दर्शनी भागात जनतेच्‍या नजरेस पडतील अशा भागात लावणे आवश्यक आहे. रूग्‍णवाहीकांचे भाडेदर हे जिल्‍हा परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले आहेत. त्‍यानुसार भाडे आकारावे रूग्‍णवाहीकेच्‍या भाड्यासंबंधी अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्‍त असल्‍याने रूग्‍णवाहीकेमध्‍ये भाडेदर निश्चित दरानुसार दर्शनी भागात लावून प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे. भाडेदर रूग्‍णवाहीकेमध्‍ये लावले नसल्‍यास मोटर वाहन कायदयानुसार कार्यवाही करण्‍यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ