शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित; महाविद्यालयांना कारणे दाखवा

 अकोला दि.9(जिमाका)- अनुसूचित जाती, जमाती, वि.जा., भ. ज., इ. मा. व. , विमाप्र इ. प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांद्वारे शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासा ठी महाडीबीटी या प्रणालीचा वापर होत असतो. या शिष्यवृत्ती योजनांच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत. मात्र, पाच महिने उलटुनही अनुसूचित जाती प्रवर्गाचे 1473 व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील 1960 अर्ज  असे एकूण 3433 अर्ज अद्यापही महाविद्यालयस्तरावरच प्रलंबित आहेत, या प्रकारास जबाबदार असलेल्या महाविद्यालयांना सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. अनिता राठोड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

यासंदर्भात सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नविन व नुतनीकरणाचे वरील योजनांचे अर्ज भरण्याची सुविधा दि.14 डिसेंबर 2021 पासून उपलब्ध करून देण्यात आली होती. वेळोवेळी शासनामार्फत शिष्यवृत्ती आवेदन पत्रे नोंदणीकृत करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये महाविद्यालयांमध्ये प्रवेशित असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे. अर्ज भरण्यासाठी प्रारंभी 31 मार्चची मुदत होती. त्या कालावधीत अपेक्षित अर्ज न आल्याने पुन्हा 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, तरीही महाविद्यालयांनी गांभीर्य न दाखवल्याने आता 31 मे पर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहेत; दि. 31 मे ही अंतिम मुदत आहे. महाविद्यालयांनी संबंधीत अर्जाची पडताळणी करून पात्र अर्ज जिल्हास्तरावर तात्काळ पाठवावे. शिष्यवृत्ती लाभापासून विद्यार्थी वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालय प्राचार्यांची राहील, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी  केले आहे.

अर्ज प्रलंबित असलेले प्रमुख महाविद्यालयांची नावे याप्रमाणे-

श्री. संत गजानन महाराज आर्टस कॉलेज – 43, गुरुकृपा महाविद्यालय – 14, डॉ. वंदनाताई ढोणे नर्सिंग स्कुल -24, गर्व्हरमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्युट -34, गर्व्हरमेंट आयटीआय – 47, आझाद हिंद नर्सिंग स्कुल – 24, महात्मा फुले नर्सिंग स्कुल – 17, डॉ. वंदनाताई ढोणे नर्सिंग स्कुल – 60, राधीका नर्सिंग स्कुल – 34, ऐंजेल ऑफ मरसी इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग सायन्स – 42, आकांक्षा सोशल फेअर ॲण्ड एचआरडीए, इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग एज्युकेशन -77, श्री. सरस्वती माता ज्यु. कॉलेज मलकापूर – 12, सुधाकरराव नाईक आर्टस, सायन्स ॲण्ड उमाशंकर खेतान कॉमर्स ज्यु. – 11, श्री. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स – 19, श्रीमती. पी.डी. पाटील सोशल वर्क कॉलेज खडकी -78, बाबू जगजीवनराम ज्यु. कॉलेज – 16, डॉ. मनोरमा ॲण्ड प्रा. एचएस पुंडकर आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज बाळापूर -13, श्री. शिवाजी हायस्कुल ॲण्ड ज्यु. कॉलेज – 15, गुलामनबी आझाद आर्टस, कॉमर्स कॉलेज बार्शीटाकळी – 15, उत्तमराव डहाके शिक्षण महाविद्यालय – 15, स्व. पांडूरंग पाटील नर्सिंग कॉलेज, बी.बी. सायन्स -11, गर्व्हरमेंट आयटीआय बार्शीटाकळी  -12, गर्व्हरमेंट आयटीआय मुर्तीजापूर -38, भारतीय ज्ञानपीठ व्हीआयडी  मुर्तीजापूर -15, श्री. गाडगे महाराज कॉलेज मुर्तीजापूर -40, माऊली ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स – 12, श्री. शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स ॲण्ड सायन्स – 11, एकूण 749

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ