मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण; नाव नोंदणीचे आवाहन

 अकोला दि.11(जिमाका) - शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे मुलींसाठी व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन तामिळनाडू येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी.सी. पांडियन यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातून पाच खेळाडू मुलींची निवड करण्यात येणार आहे, इच्छुक व पात्र मुलींनी दि.19 मे पर्यंत जिल्हा क्रीडा कार्यालयात नाव नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी यांनी केले आहे.

प्रशिक्षणासाठी आवश्यक पात्रताः-

खेळाडु 01 जानेवारी, 2023 रोजी 16 वर्षाखालील असावी, उंची 175 सेंमी. त्यापुढे, शाळेत शिकत असलेली  किंवा नसलेली व्हॉलीबॉल खेळाच्या सरावातील मुली खेळाडु शिबीरासाठी पात्र ठरणार आहे. जिल्ह्यातील गाव शहर पातळीवर असलेल्या शाळा, क्रीडा मंडळे, संस्था मधील मुली खेळाडु तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सन 2019-20 या वर्षात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तर शालेय मुली व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम चार क्रमांकाच्या शाळेतील मुली खेळाडू दि.1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील उंचीची अट पुर्ण करीत असलेल्या मुली खेळाडूंना या प्रशिक्षण शिबीरासाठी सहभागी होता येणार आहे.

जिल्ह्यातून 5 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. (01 सेटर, 02 अटॅकर, 02 युनिव्हर्सल/ब्लॉकर या खेळातील स्थानाप्रमाणे) तरी पात्र खेळाडु मुलींनी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला या कागदपत्रांच्या छायाप्रतीसह आपल्या नावाची नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे दि.19 मे दुपारी 2 वाजेपर्यंत खेळाडूने स्वत: उपस्थित राहुन करावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.

00000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ