महान येथे आपत्ती व्यवस्थापन; बचाव कार्य सराव सत्र

 





अकोला दि.10(जिमाका)- राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल नागपूर व जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने काटेपूर्णा प्रकल्प महान येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व पूर परिस्थिती मध्ये बचाव कार्य या विषयावर सराव सत्र घेण्यात आले.

या सराव सत्रास जिल्हाधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी   संजय खडसे,  उपविभागीय अधिकारी अकोट श्रीकांत देशपांडे, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार,  तहसिलदार अकोला सुनिल पाटील,  बार्शीटाकळी गजानन हमद, अकोट निलेश मडके, तेल्हारा संतोष येवलीकर, पातूर डी.आर. बाजड, मुर्तिजापूर प्रदीप पवार, बाळापूर ए.आर. सैय्यद,  तसेच सर्व नायब तहसीलदार,  मंडळ अधिकारी,  तलाठी,  स्वयंसेवी संस्था प्राधिनिधी, वंदेमातरम आपत्कालीन पथक,  कुरणखेड, आपत्कालीन पथक,  वनोजा,  शिक्षक,  आर.एल. टी. कॉलेज चे रासेयो विद्यार्थी व समन्वय उपस्थित होते. प्रशिक्षण सत्राच्या यशस्वीतेसाठी तलाठी सुनिल कल्ले,  निमकंडे,  संदीप वाघडकर व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांनी योगदान दिले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी