ग्रामपंचायत प्रभाग रचना कार्यक्रम प्रसिद्ध

 

            अकोला दि.28(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जानेवारी 21 ते डिसेंबर 22 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच दि.29 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्‍या प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रमातील निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्‍या, तसेच नव्‍याने स्‍थापि ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने दि.27 जानेवारी 2022 रोजीच्‍या प्रभागांच्‍या सीमा निश्चित करण्‍याच्‍या कार्यक्रमातील सुनावणीच्‍या टप्‍प्यापासून प्रभागाच्‍या सीमा निश्चित करण्‍यासाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार प्रभाग रचना कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, मुर्तिजापूर, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी व पातुर या तालुक्यातील एकूण 274 ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचनेला संबधित ठिकाणच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध देण्यात आली आहे, असे निवासी उप‍जिल्‍हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी ग्रा.पं./ जि.प./ पं.स. निवडणुक विभाग संजय खडसे यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ