वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ: कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 अकोला दि.9(जिमाका)- शासनाचा उपक्रम असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ(मर्या.) तर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लोकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या  वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच अन्य कर्ज योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी केले आहे. महामंडळाच्या सर्व योजनांची माहिती www.vjnt.in या संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. महामंडळाच्या बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना या ऑफलाईन असून या योजनांसाठी अर्ज विक्री महामंडळाचे जिल्हा कार्यालय,  पहिला माळा, वैष्णवी कॉम्प्लेक्स, पॉवर हाऊस समोर, गोरक्षण रोड, अकोला- दूरध्वनी- 0724-2459937 येथे सुरु आहे. थेट कर्ज योजनेचा अर्ज घेण्यासाठी  सोबत आधार कार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड सोबत आणावे. ज्या व्यवसायासाठी कर्ज हवे असेल त्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेले तसेच विधवा, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे. अर्ज विक्री, अर्ज स्विकारणे यासाठी स्वतः अर्जदाराने हजर राहणे आवश्यक असून कोणत्याही मध्यस्थामार्फत अर्ज विक्री वा अर्ज स्विकारणे केले जात नाही,असे जिल्हा व्यवस्थापक आत्राम यांनी स्पष्ट केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ