‘रेडक्रॉस’ तर्फे आरोग्य यंत्रणांना ऑक्सिमिटर वाटप

 



अकोला दि.10(जिमाका)- रेड क्रॉस सोसायटी राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणाना आधुनिक ऑक्सिमीटर उपलब्ध करुन दिले असून महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन यांच्या हस्ते ते जिल्हा आरोग्य अधिकारी व मनपा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. इंडियन रेड क्रॉस सोसायटी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा रेडक्रॉस अध्यक्ष निमा अरोरा,रेडक्रॉसचे डॉ.किशोर मालोकार,जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, अकोला महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.फारुख शेख यांची उपस्थिती होती. तसेच तारा रंगनाथन, सचिव प्रभजितसिंग बछेर, डॉ. एन के माहेश्वरी ,राजाभाऊ देशमुख, ॲड.महेंद्र साहू, ॲड.सुभाष मुंगी ,पवन माहेश्वरी, डॉ. सिमरनजीत सिंह बछेर, हिमोफिलिया सोसायटीचे सचिव परितोष सैय्याम, शर्मिला सैय्याम, एडवोकेट सुभाषसिंह ठाकूर आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.आभार प्रदर्शन मनोज चांडक यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ