अनु.जमाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाडीबीटीद्वारे भरण्यासाठी अंतिम मुदत 31 मे पर्यंत

 अकोला,दि.18(जिमाका)-महाडीबीटी या प्रणालीद्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्तीचे अर्ज  महाडीबीटी (www.mahadbtmahait.gov.in) या पोर्टलवर  महाविद्यालयांनी भरावे व  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्या लॉगईन ला पाठवावे. त्यासाठी 31 मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी कळविले आहे.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर योजनेचे अर्ज सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन भरणेसाठी शासनस्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत.त्यानूसार अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन 2021-22 या सत्रातील नविन तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ mahadbtmahait.gov.in या प्रणालीवर ऑनलाईन भरावे, त्यासाठी अंतिम मुदत दि. 31 मे पर्यंत देण्यात आली असून नंतर प्रणाली बंद होणार आहे.तरी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना अवाहन करण्यात येते की, सन 2020-21 व 2021-22 या वर्षातील महाविद्यालयस्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ त्रुटी पुर्तता करुन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या  कार्यालयाच्या लॉगीनला तात्काळ पाठवावे. विद्यार्थ्यांच्या अर्जाची हॉर्ड कॉपी महाविद्यालयस्तरावर जतन करुन ठेवावी. विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत आपले अर्ज भरुन महाविद्यालयाकडे सादर करावे. महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना अवगत करावे. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनेपासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची राहील,असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ