एकात्मिक आदिवासी विभाग; परिक्षार्थ्यांनी दिली कंत्राटी कला व संगणक शिक्षक परीक्षा

 अकोला,दि.29 (जिमाका)- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोलातर्फ रविवार(दि.29) रोजी जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक कला व संगणक परीक्षा सिताबाई कला महाविद्यालय उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. कंत्राटी शिक्षक कला परीक्षेकरीता 125 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित तर 24 अनुपस्थित होते. तसेच कंत्राटी शिक्षक संगणक परीक्षेकरीता 67 परिक्षार्थी परिक्षेस उपस्थित तर 47 परिक्षार्थी अनुपस्थित होते, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा निवड़ा समितीचे सचिव राजेंद्रकुमार हिवाळे यांनी दिली.

परिक्षेचा उत्तर पत्रिका संच परिक्षेनंतर दुपारी एक वाजता www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आले. प्रश्नपत्रिकेवरील आक्षेप अर्ज दाखल करण्याकरीता परिक्षार्थींना दुपारी तीन वाजेपर्यत वेळ देण्यात आलेली होती. सर्व प्रक्रियेअंती परिक्षार्थींना मिळालेल्या गुणांची यादी बैठक क्रमांकानुसार सायंकाळी सात वाजता www.akola.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. परीक्षा यशस्वी करण्याकरीता जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी परीक्षा नियंत्रक तर परीक्षा सुरळीत व यशस्वीपणे पार पाडण्याकरीता उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राबाहेर क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून चोख पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ