केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा

           अकोला,दि.27(जिमाका)-  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवार दि.28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.28 रोजी सकाळी साडेदहा वा. वणीरंभापूर येथे हेलिकॉप्टरने आगमन व वणी रंभापूर येथील तलाव पाहणी, सकाळी 11 वा. 15 मि. नी. बाबुळगाव तलावाची पाहणी, सकाळी 11 वा. 40 मि. नी. अमृत सरोवर  पुस्तक प्रकाशन सोहळा, स्थळ- डॉ. ठाकरे सभागृह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, दुपारी साडेबारा वाजता कमिटी हॉल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे पत्रकारांशी संवाद. दुपारी एक वा. खा. संजय धोत्रे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ- रणपिसेनगर, जागृती विद्यालयाच्या मागे, अकोला, दुपारी 1 वा.20 मि.नी. रावणकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती, स्थळ-रामनगर, रतनलाल प्लॉट,अकोला, दुपारी पावणेदोन वा. विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी भेट व राखीव.स्थळ- पुष्पलता, आळशी प्लॉट, अकोला. दुपारी साडेतीन वा. अकोला शहरातील दोन उड्डाण पूल व अमृत सरोवर या दोघा प्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती,स्थळ- क्रिकेट क्लब मैदान, अकोला, पावणे पाच वा. अकोला विमानतळावरुन नागपूरकडे हेलिकॉप्टरने रवाना.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ