शेतकऱ्यांना खते, बियाणे योग्य दराने उपलब्ध करुन द्यावे- जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. इंगळे

 


अकोला दि.6(जिमाका) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी खात्रीलायक बियाणे, खते हे योग्य दरात व लिंक न करता उपलब्ध करुन द्यावे, असे मार्गदर्शन जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांनी  जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या कार्यशाळेत केले.

तालुका कृषी अधिकारी कार्यालय अकोला यांच्यावतीने कृषी व्यवसायिक संघ अकोला यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे तसेच तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी कु. रोहिणी मोघाड,  जिल्हा अध्यक्ष कृषी व्यवसायिक संघ मोहन सोनवणे उपस्थित होते.

 

या कार्यशाळेत विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले की, बोगस बीटी बियाणे व एचटीबीटी बियाणे तालुक्यांमध्ये विकले जाऊ नये. सोयाबीन बियाण्याची विक्री करतांना उगवणक्षमता तपासूनच विक्री करण्यात यावी.बियाणे व खते विक्री करताना कोणतीही लिंक करून बियाणे/खते विकू नये. जादा दराने खते व बियाणे विक्री करू नये. शेतकऱ्यांना बियाणे व खते योग्य दराने व योग्य पद्धतीने मिळतील याचे नियोजन करण्यात यावे. कृषी सेवा केंद्र धारकांनी सर्व रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. कायद्यानुसार सर्व बाबींची पूर्तता करावी,असे मार्गदर्शन करण्यात आले.

 प्रास्ताविक व संचालन तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश     परळकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कु. मनीषा जोशी, कुमारी मीना चव्हाण, कृषी अधिकारी गजानन महल्ले, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, व्ही एच राखुंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ