पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 

अकोला,दि.१५(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे सोमवार दि.१६ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सोमवार,दि.१६ रोजी दुपारी एक वा. पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाडा संदर्भात आढावा सभा., दुपारी दीड वा. पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आरोग्य तपासणी महामेळावा संदर्भात चर्चा, स्थळ - छत्रपती सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,अकोला, दुपारी दोन वा. मौजे पाटसूल ता.अकोट कडे प्रयाण. दुपारी तीन वा. डॉ. उद्धव गाडेकर महाराज यांचे परिवारास सांत्वनपर भेट. स्थळ - पाटसूल ता.अकोट, दुपारी साडे तीन वा. वरुर जऊळका ता. अकोट कडे प्रयाण., दुपारी चार वा. विधवा महिला शेतकरी यांना ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे या तत्त्वावर 'पेरणी ते कापणी' पर्यंत मदत कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी उपस्थिती. स्थळ-मौजे वरुर जऊळका ता.अकोट, दुपारी साडे चार वा. अकोट कडे प्रयाण.

सायं पाच वा. उद्योगपुर्ण गाव-शहानुर बाबत आढावा सभा. स्थळ - कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, अकोट सायं सहा वा. रंभापुर ता.अकोट कडे प्रयाण. सायं. साडे सहा वा.श्री. सत्यपाल महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित प्रबोधन दिन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- रंभापुर ता.अकोट, सायं. साडे सात वा. शहानुरकडे प्रयाण, सायं ८ वा. वन्यजीव गणना, शहानुर येथे भेट.  सवडीने अमरावती कडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ