स्थानिक स्वराज्य संस्थामधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषीत; नोंदणी करण्याचे आवाहन


         अकोला,दि.17(जिमाका)-  नागरिकांचे मत जाणून घेण्‍यासाठी स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गाच्‍या आरक्षणासाठी घटित केलेल्‍या समार्पित आयोगाच्‍या भेटीचा कार्यक्रम घोषीत झाला आहे. त्यानुसार समर्पित आयेागाच्‍या भेटीच्‍या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावी व निवेदन देता यावे यासाठी  शनिवार दि. 28 मे रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आवाहन निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी केले.  

महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमध्‍ये नागरीकांच्‍या मागास प्रवर्गास(ओबीसी, व्‍हीजे एनटी) आरक्षण देण्‍यासाठी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. महाराष्‍ट्र राज्‍यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्‍यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्‍वीकारण्‍यासाठी समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. घोषीत कार्यक्रमानुसार आयेागाच्‍या भेटीच्‍या वेळी नागरिकांचे मते व निवेदन देता यावे यासाठी विभागीय आयुक्‍त कार्यालयात आपल्‍या नावाची नोंदणी भेटीच्‍या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ