‘सखीःवन स्टॉप सेंटर’ सुविधेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी निमा अरोरा


          अकोला,दि.24(जिमाका)-  जिल्हा स्त्री रुग्णालय येथे कार्यरत असलेले  सखीः वन स्टॉप सेंटर या दिलासा केंद्राची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा, पिडीत महिलांना या सुविधेचा लाभ द्या,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हा स्त्री रुग्णालय येथे केंद्र पुरस्कृत वन स्टॉप सेंटर सखी या योजनेअंतर्गत हिंसाचार पिडीत महिलांना वैद्यकीय सुविधा, कायदेशीर सल्ला, पोलीस सहायता, समुपदेशन व तात्पुरता निवारा या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. या केंद्रास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी भेट दिली. या केंद्राशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांची बैठकही घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, विधी सल्लागार विलास काळे, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. आरती कुलवाल,  व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. मनिषा भोरे, रुपाली वानखडे, प्रिया इंगळे, अक्षय चतरकर, रोशन ताले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी निर्देश दिले की, या सुविधेबाबत महिलांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच येथील टोल फ्री क्रमांक इ. बाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचावी जेणे करुन कोणीही अत्याचार पिडीत महिला या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवू शकेल.

या केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. या केंद्रात अत्याचार पिडीत महिलांना सुरक्षित ठेवून त्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. 2016-17 पासून हे केंद्र जिल्ह्यात कार्यरत आहे.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ