अनिवासी क्रीडा कुस्ती /बॉक्सींग प्रशिक्षण शिबिर


        अकोला,दि.११(जिमाका)-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमानाने व जिल्हा क्रीडा अधिकारा  कार्यालय व्दारा आयोजित अनिवासी क्रीडा कुस्ती/बॉक्सींग प्रशिक्षण शिबीर चे उद्याटन तहसिलदार विजय लोखंडे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१०) रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष  शिवछत्रपती  क्रीडा पुरस्कारार्थी शत्रुघ्न बिडकर हे होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय  लेखाधिकारी शरद घरडे, डॉ.रविंद्र चौधरी,  जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, राज्य क्रीडा कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव, राज्य क्रीडा बॉक्सींग प्रशिक्षक सतिशचंद्र भट यांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी खेळाडूंना प्रोत्साहानात्मक प्रबोधन करून मिशन ऑलीम्पिक मध्ये देशाचे नाव लौकीक करण्याचे आवाहन  केले. या शिबीराला जिल्हा क्रीडा प्रशिक्षण कुस्ती व बॉक्सींग स्व.वसंत देसाई स्टेडियम येथे नियमितसराव करणाऱ्या खेळाडू करीता दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिला टप्पा दि.१० ते १९डिसेंबर  पर्यंत चालणार आहे. खेळाडूंना तंत्र शुध्द प्रशिक्षण व आहार, प्रथमोपचार, मानसिक संतुलन स्पर्धा पूर्व तयारी इत्यादी माहिती व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव यांनी केले व आभार प्रदर्शन सतिषचंद्र भट्ट यांनी केले. अनिवासी क्रीडा प्रशिक्षण शिबीर (कुस्ती/बॉक्सींग) यशस्वी करण्यात करीता
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले