मुस्लीम संघटनेच्या मेळाव्या निमित्य शहरातील वाहतुकीत बदल
अकोला,दि.21 (जिमाका)- जिल्हृयातील सर्व मुस्लीम संघटनेच्या वतीने रविवार दि. 22 रोजी सकळी 9
ते दुपारी 2 वाजेपर्यंत अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे.
या मेळाव्यामध्ये जिल्हयातील विविध मुस्लीम संघटनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते नागरीक तसेच कॉग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जवळपास 50 हजार जनसमुदाय सहभागी होण्याची शक्यता आहे. त्या
दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता कायदा व
सुव्यवस्थेच्या दृष्ट्रीने वाहतुक सुरळीत
ठेवण्यासाठी शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे.
दि.22 रोजी सकाळी 9 वा.
पासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत अकोला
शहरातील व अकोला – अकोट राज्य महामार्गावरील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहने पर्यायी
मार्गाने वळविण्यात
आले आहे. असे जिल्हादंडाधिकारी तथा
जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
अ.क्र.
|
सध्या सुरु असलेला मार्ग
|
अ.क्र.
|
पर्यायी मार्ग
|
१
|
अकोट रोड कडुन आपातापा चौक – रेल्वेस्टेशन चौक- अग्रेसन चौक- टॉवर
चौक- धिंग्रा चौक- अशोक वाटीका चौक- नेहरू चौक- अमरावती रोड/ बार्शिटाकळी रोड
|
१
|
अकोट रोड कडून आपातापा चौक- रेल्वे स्टेशन ओव्हरब्रिज- अकोट स्टँड
चौक- टिळक रोड मार्ग- कोतवाली चौक- पोलीस मुख्यालयासमोरून – लक्झरी स्टँड चौक- भगतसिंग
चौक- बार्शिटाकळी/अमरावती रोडकडे जाणारी तसेच येणारी वाहतुक या मार्गाने वळविण्यात
येईल.
|
2
|
रेल्वेस्टेशन चौक- अग्रेसन चौक- टॉवर चौक- धिंग्रा चौक- अशोक वाटीका
चौक- नेहरू चौक/ गौरक्षणरोड/ कौलखेड रोड कडे जाणारी वाहतुक
|
२
|
रेल्वे स्टेशन – अग्रेसन चौक- दामले चौक अकोट स्टँड चौक- टिळक रोड
मार्ग- कोतवाली चौक- पोलीस मुख्यालयासमोरून – लक्झरी स्टँड चौक- भगतसिंग चौक- नेहरू
चौक/ गौरक्षणरोड/ कौलखेड रोड कडे जाणारी वाहतुक तसेच येणारी वाहतुक या मार्गाने वळविण्यात
येईल.
|
3
|
चांदेकर /टावर चौक- फतेह चौक- दिपक चौक- दामले चौक- मालधक्का चौक
– रेल्वे ओव्हर ब्रिज किंवा रेल्वेस्टेशनकडे जाणारी येणारी वाहतुक
|
|
चांदेकर चौक- गांधी चौक-कोतवाली
चौक टिळक रोड मार्ग, अकोट स्टँड चौक- रेल्वे स्टेशन ओव्हर ब्रिज किंवा रेल्वेस्टेशनकडे
जाणारी येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
|
4
|
अकोला ते अकोट कडे जाणारी वाहतुक व अकोट ते अकोला कडे येणारी वाहतुक
|
|
अकोट बस स्टँड- अशोक वाटीका चौक- नेहरू पार्क चौक – हुतात्मा चौक-
भगतसिंग चौक- वाशिम बायपास- शेंगाव टि पाँईट गायगाव- निंबा फाटा- देवरी – अकोट- तसेच
अकोट ते अकोला कडे येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात येईल.
|
5
|
अकोला बस स्थानक- रेल्वेस्टेशन चौक- आपातापा चौक – म्हैसांग मार्गे दर्यापुर तसेच दर्यापुर ते अकोलाकडे येणारी वाहतुक
|
|
अकोला बस स्थानक -पोस्ट ऑफीस चौक - सिव्हील लाईन चौक नेहरू पार्क
चौक – हुतात्मा चौक- भगतसिंग चौक- वाशिम बायपास- शेंगाव टि पाँईट गायगाव- निंबा फाटा-
देवरी – अकोट- दर्यापुर तसेच दर्यापुर ते अकोला कडे येणारी वाहतुक याच मार्गाने वळविण्यात
येईल.
|
|
|
|
|
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा