जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन स्पर्धा परिक्षा यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास व चिकाटी आवश्यक सहाय्यक जिल्हाधिकारी- अशिमा मित्तल






        अकोला,दि.5(जिमाका)- स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व चिकाटी असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  अहमदनगरच्या  भारतीय  प्रशासन सेवेतील  सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या वतीने स्‍पर्धा परीक्षेची तयारी     करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज गुरुवार( दि. ५) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात  स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन उपक्रम  राबविण्यात आला . त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, सहकारी  संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे,  जिल्हा समन्वयक गजानन महल्ले यांची  प्रमुख उपस्थिती होती.
            अशिमा मित्तल पुढे म्हणाले की, स्पर्धा परिक्षेचा सराव करतांना  प्रथम मुख्य परिक्षेवर  लक्ष केंद्रीत करावे त्यानंतर  पुर्व परिक्षेच्या दोन तीन  महिन्या अगोदर  पुर्व परिक्षेचा अभ्यास करावा.  दररोज  किमान  आठ तास तरी  चिकाटीने अभ्यास करावा. अभ्यास करतांना  प्रत्येक विषयाचा सविस्तर रित्या  वाचन करावे.  आवश्यकता वाटल्यास  एखादा  भाग लिहून पाहावा. अभ्यास आत्मविश्वासाने करावा असेही त्या म्हणाल्या.  निवासी उपजिल्हाधिकारी यांनी  कार्यक्रमाबाबत  माहिती आपल्या  प्रास्तविकातून दिली. यावेळी  सहकारी  संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे, जिल्हा परिषदेचे  पशुसंवर्धन अधिकारी  डॉ. जयप्रकाश मिश्रा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ